Searching...

Shri Sai Baba ji ki Aarti (श्री साई बाबा की आरती )

11:09


सौख्यदातारा जीवा ।चरणरजतळीं निज दासां विसावां ।
भक्तां विसावा ॥धृ॥ 
जाळुनियां अनंग ।स्वस्वरुपी राहे दंग ।
मुमुक्षुजना दावी ।निजडोळां श्रीरंग ॥१॥
जया मनीं जैसा भाव ।तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाघना ।ऐसी ही तुझी माव ॥२॥
तुमचें नाम ध्यातां ।हरे संसृतिव्यथा ।
अगाध तव करणी ।मार्ग दाविसी अनाथा ॥३॥
कलियुगीं अवतार ।सगुणब्रह्म साचार ।
अवतीर्ण झालासे ।स्वामी दत्त दिगंबर ॥४॥
आठा दिवसां गुरुवारी ।भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया ।भवभय निवारी ॥५॥
माझा निजद्रव्य ठेवा ।तव चरणसेवा ।
मागणें हेंचि आता ।तुम्हा देवाधिदेवा ॥६॥
इच्छित दीन चातक ।निर्मळ तोय निजसुख ।
पाजावें माधवा या ।सांभाळ आपुली भाक ॥७॥

0 comments:

Post a Comment

Thanks For Your FeedBack....